हिरापूर सील बंद.
घाबरू नका, सतर्कता बाळगा; प्रशासनाचे आवाहन.
Bhairav Diwase. Aug 11, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- आज सावली तालुक्यात नवीन 3 रुग्णांची भर पडल्याने खळबळ माजली आहे.सावली तालुका कोरोना मुक्त असतांनाच काही दिवसापूर्वी सावली तालुक्यात बाहेर गावावरून आलेला रुग्ण हा पॉझिटिव्ह होता.आणि त्यांनी सुरुवात करीत आत्तापर्यंत 3 रुग्ण होते.आज मात्र तालुक्यातील हिरापूर येथील एक महिला ही मुख्यमार्गाच्या कामावर जात होती. तिला 2 दिवसापासून ताप येत होता ती बोथली येथील आरोग्य केंद्रामध्ये तपासणी केली.तिची कोरोना ची टेस्ट घेण्यात आलेली होती. तो अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली असून दुपार पर्यंत ची सावली तालुक्यातील पॉझिटिव्ह संख्या ही 3 झालेली होती.तिच्या संपर्क मधील ची तपासणी केली असता त्यातील 2 जण पुन्हा पॉझिटिव्ह निघाल्याने आता ऐकून संख्या 5 झालेली आहे. ही महिला कोणत्याही गावावरून आलेली नव्हती मात्र ती मुख्य रोड च्या कामावर जात होती.या कामावर गडचिरोली जिल्ह्यातील अनेक जण विना परवाना प्रवेश करून काम करीत असल्याचे कळते.त्यामुळे ही महिला कुणाच्या संपर्कातुन तिला कोरोना ची बाधा झाली याचा तपास होत आहे. हिरापूर या गावाला सील बंद केले असून आत्तापर्यंत 20 जणांच्या वर कॉरोंटाईन केले असल्याची माहिती आहे.त्यामुळे घाबरून न जाता सतर्कता बाळगा असे आवाहन प्रशासानने केले आहे.