भाजपा महिला आघाडीच्या वतीने पोलिस स्टेशन गोंडपिपरी येथे पोलिसांना राखी बांधून आणि सन्मान पत्र देऊन सन्मान.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Aug 09, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- निरंतर जनतेला सेवा देणारे पोलिस बांधवांना भाजपा महिला आघाडीच्या महिलांनी राखी बांधून पोलिसांचा सन्मान केला. व त्यांना त्यांच्या कामांचा प्रशंसा करीत मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून सन्मान पत्र देण्यात आली.
यावेळी कु.अल्काताई आत्राम सभापती पोंभूर्णा पं.स. सौ वैष्णवी बोडलावार जि प सदस्या, सौ स्वाती वडपल्लीवार, जि. पण सदस्या, सौ सुनिता येग्गेवार सभापती पं.स.गोंडपिपरी, सौ कूसूमताई ढूमणे, सूरेखाताई श्रीकोंडवार महिला आघाडीच्या गोंडपिपरी तालुका अध्यक्षा ,सौ कोहपरे, अस्मिता रापलवार आदी उपस्थित होते