चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट आज 401 पॉझिटिव्ह.

Bhairav Diwase
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट.
Bhairav Diwase. Sep 11, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- आज 401 पॉझिटिव्ह मिळाले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 5253 इतकी झाली आहे.  सध्या जिल्ह्यामध्ये 2722 बाधित उपचार घेत आहे. आतापर्यंत 2827 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.

 24 तासात 5 बाधितांचा मृत्यू झाला आहे . ज्यामध्ये बालाजी वार्ड येथील 48 वर्षीय पुरुष , सिस्टर कॉलोनी येथील 42 वर्षीय महिला , माजरी मधील 55 वर्षीय पुरुष , बल्लारपूर येथील 56 वर्षीय पुरुष व पाचवा मृत्यू ब्रह्मपुरी शहरातील 78 वर्षीय बाधितांचा मृत्यू झाला . सर्व मृतक बाधितांना कोरोनासह न्यूमोनियाचा आजार होता अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे .

चंद्रपूर जिल्ह्यातील 57 सह एकूण 53 कोरोना (चंद्रपूर जिल्हा) बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी जनतेला आव्हान केले जात आहे. जनतेनी सतर्क राहून जिल्हा प्रशासनाच्या नियमावलीचे पालन करावे.

कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सविस्तर माहिती थोड्या वेळात.....