कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मूल येथील किराणा दुकाने १४ ते २० सप्टेंबर पर्यंत बंद राहणार.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Sep 12, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- शहर आणि तालुक्यातील अनेक गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. किराणा साहित्य खरेदी करण्याकरिता शहरातील व ग्रामीण भागातील नागरिक मोठया संख्येने मूल शहरात येवून साहित्य खरेदी करीत आहेत. यामुळे शहरात गर्दीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून दुकानातील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . अशीच परिस्थती येणाऱ्या दिवसात राहिल्यास तालुक्यात कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो. ही संभावना लक्षात घेवून तालुक्यात वाढत असलेली कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरातील किराणा व पान मटेरीयल व्यापारी असोसिएशनने १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर पर्यंत किराणा दुकान स्वयंस्फुतीने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे . प्रशासनाने किराणा व्यापारी असोसिएशनचे आभार मानले असून नागरिकांनी व्यापारी बंधू आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.