Top News

नदीत बुडून शिवम सावरकर बेपत्ता.

Bhairav Diwase. Sep 29, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- मुल येथील व्यवसायी प्रकाश सावरकर यांचा मुलगा शिवम सावरकर (१८ वर्षे) हा उमा नदीच्या कोसंबी घाटावर पोहण्यासाठी गेला असता नदीत बुडाल्याची विश्वसनिय माहीती आहे. स्थानिक नव भारत विद्यालयाचे पटांगणावर क्रिकेट खेळुन झाल्यानंतर सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान शिवम सहा मिञांसोबत कोसंबी घाटावर पोहायला गेला होता. पोहतांना निंबाळकर नामक मिञ पाण्यातील खोल खड्ड्यात बुडत असल्याचे लक्षात येताच काही मिञ त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते. दरम्यान शिवम सावरकर हा त्यांच्या मदतीला जात असतानाच तो खोल पाण्याच्या प्रवाहात बुडाला. निंबाळकर नामक मिञाला पाण्याबाहेर काढण्यात यश आले परंतु शिवम सावरकर याला बाहेर काढता आले नाही.
सदर घटनेची माहीती होताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाली. नदी पाञात रेती उत्खनना सोबतच नवीन पुलाचे बांधकाम सुरू असल्याने मोठे खड्डे पडले आहेत, पाणी सुध्दा भरपुर असुन प्रवाह वेगात आहे.

 त्यामुळे बोटीसह नावाड्यांना बोलावण्याचे पोलीसांचे प्रयत्न सुरू आहेत, बोट उपलब्ध होई पर्यंत मूल वरून पोहण्यात तरबेज असलेल्या ढिवर बांधव बुडालेल्या शिवमचा शोध घेत आहेत. मुल तालुका नदीने वेढला असून चारही बाजूने नद्या वाहत असतात मूल स्थानिक प्रशासनाकडे स्वतःची बोटं नसल्यामुळे मृतदेह काढण्यासाठी बोट चंद्रपूर आपत्ती विभागाकडून बोलवावी लागते तरी प्रशासनाने मुल तालुक्यासाठी स्वतःची बोट उपस्थित करून अशी मागणी जनतेकडून होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने