पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार पोलीस स्टेशनमध्ये कोरोनाचा शिरकाव.

Bhairav Diwase
ऑंटीजन चाचणी मध्ये निघाला कोरोना पॉझिटिव्ह.
Bhairav Diwase. Sep 23 2020


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहरात व ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत आहे. चंद्रपूर जिल्ह्याची रुग्ण संख्या 8000 च्या वरती पोहोचली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यामध्यील ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पोंभुर्णा तालुक्यामध्ये रुग्ण संख्येत वाढ होत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, माझ कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत प्रत्येक तालुक्यात व ग्रामीण भागात ऑंटीजन चाचणी घेण्यात येत आहे. आज पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार या गावात ऑन्टिजन चाचणी घेण्यात आली असता. पोलिस स्टेशन उमरी मधील 1 पोलीस कॉन्स्टेबल हा पॉझिटिव्ह आला आहे. तसेच पोलीस स्टेशन उमरी मधील पोलीस कॉन्स्टेबल याच्या संपर्कात आलेले कर्मचाऱ्यांची टेस्ट करण्यात आली असून, ते सर्व निगेटिव्ह आले आहे.
    आपल्याला सर्दी, खोकला किंवा ताप असल्यास लवकरात लवकर एंटीजन टेस्ट करून घ्यावी. व वेळेवर उपचार करून घ्यावा ही विनंती. तसेच आम्ही वेळोवेळी गावात येऊन covid-19 संबंधी दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्वांनी मास्कचा वापर करावा. तसेच एक दुसऱ्याशी बोलताना 2 मीटर अंतरावरून बोलावे व वारंवार साबणाने हात धुवावे. इत्यादी सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे व इतरांना सुद्धा माहिती द्यावी. असे आवाहन गावातील नागरिकांना करण्यात आले आहे.
प्रदीपकुमार नितवणे पो उप नि
ठाणेदार उप पोलीस स्टेशन
 उमरी पोद्दार