Click Here...👇👇👇

ग्रामपंचायत चिखली खुर्द येथिल सिमेंट काँक्रेट रस्ता निकृष्ट दर्जाचा.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Sep 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- अतिदुर्गम व अविकसित समजणारा जिवती तालुक्यातील चिखली खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने 14 वित्त आयोगामधून नरहरी सोळंके यांच्या घरापासून ते रामा कोळगीर यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ताचे काम
 सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी गावातील नागरिक करताना दिसत आहे.
सिमेंट काँक्रेट रोड ठरल्याप्रमाणे करता येत नाही तसेच हा रस्ता रुंदीला कमी करण्यात आलेला आहे याबाबत काही ग्रामस्थांनी सरपंच यांच्या कडे तक्रार केली तसेच इंजिनियर गेडाम यांच्यासोबत दूरध्वनीवर फोन केला असता त्यांनी सुद्धा उडवाउडवीचे उत्तर देत आहेत.
ग्रा पं चिखली खुर्द येथे रस्त्याचे काम विविध योजनेतून होते आहे. रस्त्यामुळे गावांच्या विकासालाही सजग दृष्टी प्राप्त होतो पण सरपंच, ठोकेदार, इंजिनियर, व बि.डि.ओ यांच्या मनमानी कारभार सुरू आहे. यामुळे गाव विकासालाही चालना मिळात नाही आहे, असे चित्र ग्रा पं चिखली खुर्द येथे दिसत आहे. चिखली खुर्द ग्रामपंचायत कडे अनेक लोकप्रतिनिधीकडून व प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.