मुल येथील संतापजनक प्रकार उघडकिस!
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- कोरोना चाचणी अहवाल येण्यापूर्वीच मूल येथील एका महिलेला पॉजिटिव्ह रूग्ण असलेल्या कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आल्यांचा, आणि या महिलेचा अहवाल नंतर, निगेटिव्ह आल्याचा धक्कादायक प्रकार मूल शहरात आज उजेडात आला. कोरोणा निगेटिव्ह महिलांना मूलच्या आरोग्य यंत्रणेने दिलेली 'पॉझिटिव्ह' ट्रिटमेंट (वागणूक) शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.
एका कोरोना बाधीत रूग्णाच्या संपर्कात आलेल्या आठ नागरीकांचे अहवाल यायच्या आधीच त्यांना बाधीत ठरविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आज मूल मध्ये घडला . येथील नगर प्रशासनाने ही चूक केल्याची बाब उघडकीस आली आहे. या घटने विषयी मूल मध्ये सर्वत्र प्रशासनाविषयी संताप व्यक्त केल्या जात आहे. निगेटीव्ह महिलांना पाॅझेटिव्ह महिलां मध्ये ठेवल्याने प्रशासनाच्या कार्य तत्परतेविषयी संशय व्यक्त केल्या जात आहे.
मिळालेल्या माहिती नुसार मूल येथील जुना रेल्वे स्टेशन परिसरात एक महिला बाधीत निघाली होती, त्याच्या घरचे आणि संपर्कातील व्यक्तींचेही नमुने घेतले होते, मात्र अहवाल येण्याआधीच त्यांना बाधीत दाखवुन काहीना गृह विलगीकरण तर दोन महिलांना भाग्यरेखा सभागृहात विलगीकरण करण्यात आले होते, मात्र शुक्रवारी रात्रौ 11 वाजताच्या दरम्यान या आठही नागरीकांचा अहवाल निगेटीव्ह आल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. विशेष म्हणजे हया निगेटीव्ह महिला बाधीत असलेल्या महिलांच्या जवळ ठेवण्यात आले होते. प्रशासनाच्या सावळया गोंधळा विषयी आज सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली होती.
काहींनी या घटनेविषयी तीव्र संताप व्यक्त केला आहे.