दक्षता समितीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेकडे केली मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर तालुक्यातील डोमा येथील स्वस्त धान्य दुकान पुरवठा करण्याचा परवाना पी एम गाडगे यांच्या नावाने असून यांच्या स्वस्त धान्य दुकानातून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या मोफत अन्न धान्य वाटप योजनेतून अनियमिता करून अफरातफर केली याबाबत चिमूर तहसील प्रशासनला तक्रार केली असता तहसीलदार यांनी दखल घेत चौकशी करून पी एम गाडगे यांचे दुकान स्वस्त धान्य दुकान तात्पुरते निलंबित करून बोडधा येथील स्वस्त धान्य दुकानास जोडणी करून धान्य वाटप केले आहे परंतु पी एम गाडगे यांनी बनावट रेकार्ड करून जनतेची व शासनाची दिशाभुल फसवणूक केल्याने डोमा येथील स्वस्त धान्य दुकान पी एम गाडगे यांचे कायमस्वरूपी परवाना रद्द करून नवीन परवानाधारक नेमून देण्याची मागणी माजी उपसरपंच देवानंद मालके ,तुळशीराम दोडके व नागरिकांनी केली आहे .
डोमा येथील स्वस्त धान्य दुकान हे पी एम गाडगे चालवीत असताना कोरोनात भारत सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून प्रतिव्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ वाटप योजनेत जवळ पास ४० ते ५० लाभार्थ्यांना धान्य दिले नाही ,तसेच युनिट प्रमाणे तांदूळ ,गहू वाटप न करता अनियमित वाटप केले याची दखल ग्राम पंचायत व दक्षता समितीने घेततहसीलदार चिमूर यांना तक्रारी केल्या असता पुरवठा अधिकारी उपरे यांनी चौकशी केली त्यात चौकशीत नागरिकांना असभ्य बोलणे, मंजूर धान्य कमी देणे, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या तांदूळ धान्य वाटप न करणे ,दिले तर कमी देणे आदी गंभीरपणे बाबी चौकशीत पुढे आल्याने तहसीलदार चिमूर यांनी दखल घेत चौकशी करून पी एम गाडगे यांचे दुकान स्वस्त धान्य दुकान तात्पुरते निलंबित करून बोडधा येथील स्वस्त धान्य दुकानास जोडणी करून धान्य वाटप केले आहे परंतु पी एम गाडगे यांनी बनावट रेकार्ड करून जनतेची व शासनाची दिशाभुल फसवणूक केल्याने डोमा येथील स्वस्त धान्य दुकान पी एम गाडगे यांचे कायमस्वरूपी परवाना रद्द करून नवीन परवानाधारक नेमून देण्याची मागणी माजी उपसरपंच देवानंद मालके ,तुळशीराम दोडके ,सुरेश गायकवाड, कवडू ननावरे ,घनश्याम मुन, दादाजी चौधरी ,अन्सार शेख ,नथु ननावरे, भाऊराव दडमल ,अशोक राणे ,
वामन लांजेवार, देविदास हजारे ,ईश्वर हनवते , संदीप सोनवणे, दुर्योधन दोडके, मारोती सेलोरे, पंचफुला सेलोरे ,ईशवर घरत ,मैनाबाई घरत ,कल्याणी किरीमकर, गिरीजा ननावरे ,नंदा सावसकडे ,मदा दुर्गपाल, उषा दुर्गपाल ,चंद्रभागा ननावरे, शारदा सावसकडे वंदना सोनवणे उल्का ननावरे ,मनोहर ननावरे ,फुलकण्या सोनवणे ,सोमा सोनवणे ,सुमन ननावरे, देवगना सोनवणे, श्रीकृष्ण ननावरे ,देवका दडमल ,राजेराम ननावरे ,उषा दडमल, कुसुम ननावरे व अन्याय ग्रस्त नागरिकांनी मागणी केली आहे.