अतिरिक्त रुग्णवाहिका खरेदी करा.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपुर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. टाळेबंदी, जनता कर्फ्यु आदी सर्व उपाययोजना करुनही कोरोनाचा संसर्ग काही थांबेना. कोरोनाचे वाढते रुग्ण, प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार यामुळे आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. चंद्रपुर शासकीय कोविड रुग्णालयामध्ये रुग्णांना ठेवायला जागा नाही.वेंटीलेटर, आई.सी.यू उपलब्ध नाही.सर्व विलगिकरन केंद्र रुग्णांनी भरलेले आहेत.कोविड रुग्णालयात तसेच विलगिकरण केंद्रात रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे.कोरोना रुग्णांना योग्य उपचार मिळत नाही त्यामूळे कोरोना रुग्णांचा मृत्यूदर वाढला आहे.शासनाने नेमलेले खाजगी कोविड हॉस्पिटल येथे देखील कोरोना रुग्नाणा बेड उपलबध नाही.गोरगरिबांना खाजगी उपचार परवडणारे नाही.
महाराष्ट्र शासनाची 108 रुग्णवाहिका सेवा ही कोरोना रुग्णांना उपचार स्थळी पोहचवीण्यास कमी पडत आहे. रुग्णवाहिके अभावी एखादा रुग्ण कोरोना पॉजिटिव आल्यानंतर त्या रुग्णाला त्याच्या घरुन दवाखान्यात न्यायला दोन-दोन दिवस लागत आहे तसेच कोरोनातून बरा झालेल्या रुग्णांना त्याच्या घरी सोडायला दोन दोन दिवस लागत आहे.कोविड परिस्थिती पूर्णपणे प्रशासनाच्या नियंत्रणा बाहेर गेली आहे.म्हणुनच चंद्रपुरातील कोरोना संसर्ग कमी करायचा असेल तसेच कोरोना रुग्नाना चांगले उपचार व बेड उपलब्ध करायचे असल्यास चंद्रपुरात जंबो कोविड रुग्णालय लवकरात लवकर उभारा तसेच अतिरिक्त रुग्णवाहिका तत्काल खरेदी करा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपुर च्या वतीने जिल्हाधिकारी अजय गुल्हने व मनपा आयुक्त राजेश मोहिते यानां दिले आहे.लवकरात लवकर जंम्बो कोविड रुग्णालय तसेच अतिरिक्त रुग्णवाहिका खरेदी न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जनहितार्थ तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे नगरसेवक सचिन भोयर यांनी दिला. यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार, करण नायर, संजय फरदे, राकेश पराडकर, तुषार येरमे, सुयोग धवलाकर, मयुर मदनकर आदी महाराष्ट्र मनसैनिक उपस्थितीत होते.