७० व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी भिसी यांचा उपक्रम.
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी भिसी यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र भिसी येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सदस्य प्रदिपभाऊ कामडी,भिसी आंबोली जिल्हा परिषद प्रमुख नितीनभाऊ गभणे,ग्राम पंचायत सदस्य देवेंद्रभाऊ मुंगले,विनोदभाऊ खवसे,सुरेन्द्रभाऊ घरत, राजू भाऊ भीमटे,आकाश भाऊ ढबाले,नंदू वासनिक वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियंका कष्टी,डॉ.धनश्री मुंगले,परीचालिका वरठी ,आरोग्यसेवक धानके उपस्थित होते.