शुक्रवारी पालकमंत्रासोबत राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांची बैठक.
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- चंद्रपूर शहर आणि काही तालुक्यांच्या ठिकाणि कोरोना समूह संसर्ग सुरू झाल्यामुळे जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, आणि आरोग्य यंत्रणा चिंतेत असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पंधरा दिवससाठी “जनता कर्फ्यू ” लावण्यासाठी पालकमंत्री आ. विजय वडेट्टीवार हे गंभीरपणे विचार करीत आहेत. त्या साठी शुक्रवारी विजय वडेट्टीवार यांच्यासोबत विविध राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी साहेब यांच्या सोबत आधार न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक यांनी संपर्क साधला असता यासंदर्भात माहिती दिली...
चंद्रपूर जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागामध्ये रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे, उद्याच्या बैठकीमध्ये जनता कर्फ्यू लावण्याच्या संदर्भात चर्चा होणार आहे:- अजय गुल्हाणे जिल्हाधिकारी चंद्रपूर