प्रशासन सुस्त रेतीचोर मस्त; साखरी घाटावरील प्रकार.
रात्री 4 वाजेपासून रेतीची चोरटी वाहतूक.
Bhairav Diwase. Sep 22, 2020
सावली:- संपूर्ण जगात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले असतानाच गल्ली ते दिल्लीपर्यंत सर्व शासकीय यंत्रणा याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी रस्त्यावर उतरली आहे. मात्र, सावली तालुक्यात लॉकडाऊनच्या अंमलबजावणीचे तीन-तेरा वाजवत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अवैध रेतीची सर्रास वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
यातून शासनाला लाखोचा चुना लागत असल्याने, महसूल विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सावली तालुक्याला लागून असलेल्या वैनगंगा नदीच्या घाटावर अवैध रेती वाहतुकीला उधाण आले असून रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर च्या माध्यमातून शेकडो ट्रॅक्टर ब्रासरेती चोरी केल्या जात आहे. यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असून पर्यावरणाला हानी पोहोचत आहे याला प्रशासनाने वेळीच आळा घालावा व रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यात याव्या आशि मागणी केली जात आहे
रात्रभर ट्रैक्टर नियमित चालत असल्यामुळे परिसरातील लोकांची झोप उडाली आहे. रेती तस्करांनी हजारो ब्रास रेती गावालगत साठवन करून ठेवले असल्याची चर्चा आहे. या तस्करांना अभय कुणाचे? या बाबत चर्चा रंगू लागल्या असून काही महसूल विभागाचे कर्मचारी रेती माफियाच्या आर्थिक प्रलोभनाला बळी पडत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे त्यामुळे रेती माफियाचे फावले जात आहे रेतीची अवैधपणे चोरी होताना आणि अनेक ठिकाणी रेतीचे ढिगारे दिसत असताना कुण्या अधिकाऱ्याचे लक्स जाऊ नये याबाबत शंका व्यक्त केली जात आहे
कोरोनाच्या काळात तालुक्यासह ग्रामीण भागातील माणसाला बाहेर पडणे मुषकील झाले असताना आणि अधिकारी कर्मचारी व्यस्त असल्याची सुवर्ण संधी साधून रात्री बेरात्री रेतीच्या चोरट्या वाहतूकिला मात्र उधाण येत आहे खुले आम रेतीची चोरटी वाहतूक प्रशासनाचा लाखो रुपये महसूल बुडविणारी ठरत आहे अश्या माफियांवर कारवाई का होत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील साखरी सिर्शी हरांबा डोनाला सामदा,सोनापुर आदी अनेक गावे वैंनगंगा नदी लागत असून या भागातील असलेल्या घाटावरून किव्हा नवीन मार्ग बनवून रेतीची चोरटी वाहतूक केली जात आहे सामान्य माणसाला रेती मिळणे कठीण झाले असताना अनेक ठिकाणी सुरू असलेल्या कामावर मात्र रेतीची ढिगारे पडलेली दिसतात,याला महसूल विभागाचा आशीर्वाद म्हणावा काय
सावली तालुक्यात अनेक घाटावर चोर मार्ग रेती तस्करांनी तयार केलेले असून राजरोसपणे व बिनधास्त रेती ची चोरटी वाहतूक सुरू असल्याने यांना पाठबळ नेमके कुणाचे?प्रशासनाच्या सुस्त पणामुळे रेती चोर मात्र मस्त झाले आहे साखरी घाटावरून तर रेती माफियानी रेती चोरीचा धडाका धरला असून पा हा ठे 4 वाजे पासून रेती ची वाहतूक केली जात आहे तेव्हा अश्या चोर माफियांवर त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे .