Top News

ग्रामपंचायत कोंडेखल चा भोंगळ कारभार; नागरिक हैराण.

Bhairav Diwase.    Sep 28, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- सावली तालुक्यातील कोंडेखल येथे गट ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायत मध्ये कोंडेखल, जांब रैयतवारी, चक पेठगाव आणि बांधचक रै. ही गावे समाविष्ट आहेत. जेव्हापासून कोंडेखल ग्रामपंचायत अस्तित्वात आली तेव्हापासूनच कोंडेखल हे गाव वगळता  बाकी गावे ही विकासापासून कोसो दूर लांब आहेत. म्हणजे एक मुलगा तुपाशी व बाकी मुले उपाशी असा प्रकार कित्येक वर्षांपासून चालू आहे. आज घडीला कोंडेखल ग्रामपंचायत ला 15 वा वित्त आयोगाचा निधी आलेला आहे. यापूर्वी 14 वित्त आयोगाचे निधी आले अन संपले सुध्या. परंतु त्या निधीमधून इतर गावांमध्ये विकासाची गती काही वेग घेऊ शकली नाही. शिक्षण आरोग्य व अंगणवाडी वर जो निधी खर्ची करायचा आहे तो आजमितीस कोंडेखल वगळता इतर गावामध्ये कधीच खर्ची झाला नाही.
 गटग्रामपंचायत असूनही इतर गावाच्या तसेच गावातील शाळेच्या विकासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. जांब रैयतवारी येथे जिल्हा परिषद ची प्राथमिक शाळा असून 35 विद्यार्थी ज्ञानार्जनाचे धडे गिरवत आहेत. परंतु 14 व्या वित्त आयोगातून एकही रुपयांची मदत करण्यात आलेली नाही. आलेला संपूर्ण निधी कोणत्या विकास कामामध्ये खर्च झाला हे एक गूढ निर्माण झालेले आहे. तसेच 15 व्या वित्त आयोगाचा निधी प्राप्त झालेला आहे. आता त्या निधीमधून तरी शाळेवर काही निधी खर्च होईल की नाही याबाबत साशंकता आहे. लगतच्या ग्रामपंचायत यांनी आलेल्या निधीमधून काही निधी शाळेला दिलेला आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांनी वारंवार ग्रामपंचायत  कोंडेखल मध्ये शाळेला आवश्यक असणारे साहित्य तसेच इतर कामे करून द्यावीत याविषयी सांगितले  व गाव विकास आराखड्यात तशी मागणी पण केली. परंतु कोंडेखल ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे केराची टोपली दाखविली आहे. ज्या शाळेतून भावी पिढी घडवण्याचे काम होते त्याच शाळेच्या विकासाकडे कोंडेखल ग्रामपंचायत ने दुर्लक्ष केलेले आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी रीतसर तक्रार दाखल केली असून जर तक्रारीची दखल न घेतल्यास मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे दाद मागण्याचे ग्रामपंचायत प्रशासनाला कळविले आहे.
 तसेच रैयतवारी गावातील गृहकर हे जवळपास 90% वसूल होते. तरीसुध्या रैयतवारी गावातील रस्त्यावर विजेचे पोल तर आहेत पण त्या पोलवर गेले 6 महिने झाले बल्ब लागने बंद झालेले आहे. काही नेमके रोडवरील लाईट सोडले तर 80% लाईट अजूनही बंद पडलेले आहेत. इतकी वाईट परिस्थिती कोंडेखल ग्रामपंचायत वर म्हणण्यापेक्षा ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या इतर गावावर आलेली आहे. 
   या सर्व ग्रामपंचायत च्या भोंगळ कारभाराकडे कुणी वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का याविषयी सर्व गावातील लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे. तेव्हा वेळीच तक्रारीची दखल न घेतल्यास आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने