(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या प्रभाग ५ मध्ये आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या सोयीसाठी विविध कामे प्रगती पथावर होत असून माणिकनगर मधील नाली बांधकाम मध्ये मनमानी कारभार होत नसून सोयीस्कर होत असल्याचे भाजपचे युवा नेते हरीश पिसे यांनी सांगितले
चिमूर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या प्रभाग ५ मधील माणिक नगर परिसर समस्यांचे नगर होते तेव्हा या परिसराचा कायापालट करण्यासाठी नागरिकांच्या वतीने आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या कडे जाऊन समस्या विशद केल्या होत्या तेव्हा खनिज विकास निधीतून आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी निधी देत अनेक ठिकाणचे सिमेंट रस्ते व नाली बांधकाम झाले दरम्यान धोटे ते मांडवकर यांच्या घरापर्यत नाली होती ते पूर्ण तुटून ब्लॉक झाली होती व तिथे पाणी साचून रहात होते त्याच्यामुळे लोकांच्या विहिरीचे व बोरवेल चे पाणी खराब होत होते बांधकाम हे जनतेच्या सोयीसाठी होत आहे व ते काम खणीज विकास निधी अंतर्गत मंजूर झालेल्या जागेवरच होत आहे कामात कोणाचाही मनमानी कारभार होत नसून सदर काम सोयीस्कर होत असल्याचे भाजपचे युवा नेते हरीश पिसे यांनी सांगितले.