सामाजिक सभागृहाचे बांधकाम त्वरीत सुरू करण्यात यावे.

Bhairav Diwase
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे नगरपंचायत पोंभुर्णा यांना निवेदन.
Bhairav Diwase.    Sep 01, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभुर्णा येथील वार्ड क्रमांक १४मधील सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्यात दिरंगाई होत असुन याला दोषी असणार्या अधिकार्यांवर कारवाई करुन सदर बांधकाम त्वरीत सुरू करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे तालुका अध्यक्ष भुजंग ढोले यांनी नगरपंचायत पोंभुर्णा मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.



      पोंभुर्णा येथील प्रभाग क्रमांक १४ मध्ये सामाजिक सभागृह व संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला.तसे पत्र १३ सप्टेंबर २०१९ ला काढण्यात आले.परंतु अनेक दिवस लोटुन सुध्दा सभागृहाचे बांधकाम सुरु करण्यात आलेले नाही याबाबत वरीष्ठ अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली आहेत.यावरुन असे सिद्ध होते कि सामाजिक सभागृहाचे बांधकाम सुरु करण्यासाठी ते अधिकारी उत्सुक नाहीत.त्यामुळे हा निधी परत जाण्याचा मार्गावर आहे.
     यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी व बांधकाम त्वरीत सुरू करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे तालुका अध्यक्ष भुजंग ढोले यांनी नगरपंचायत पोंभुर्णा चे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदन देताना छगन निकुरे, गणेश ढोले,व इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.