म्हाडा कॉलोनी युवक गणेश मंडळ तर्फे डेबू सावली वृद्धाश्रम येथे धान्य वाटप.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Sep 01, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- म्हाडा कॉलोनी चंद्रपुर येथे म्हाडा कॉलोनी युवक गणेश मंडळ तर्फे  आज दिनांक 31/08/2020 रोज सोमवारला देवाडा येथील डेबू सावली वृद्धाश्रम येथे अनाज वाटप करण्यात आले.
       म्हाडा कॉलोनी युवक गणेश मंडळ नेहमी विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सेवा देण्याचे कार्य करत असते. रक्तदान शिबिर असो की,समाजसेवा अश्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून हे मंडळ नेहमी चर्चेत असते.
     सध्या लॉकडाऊन मुळे डेबू वृद्धाश्रमाला  सुद्धा मदत कार्य कमी होत आहे.याचे भान ठेवून सामाजिक बांधीलकी समजून येथील वृद्धांना धान्य वाटपाच्या माध्यमातून मदतीचा हाथ म्हाडा कॉलोनी युवक गणेश मंडळ यांनी दिला.
      या वेळी म्हाडा कॉलनी मित्र मंडळ चे मयूर मदनकर,करण नायर,नितेश शेंडे,रोहित शर्मा,दीपक शर्मा,मोहित मदनकर,सुशांत शर्मा,अक्षय काकड़े,पवन यादव,यश काकड़े,गुरुप्रीत कंग,यश घागरगुंडे,भूषण अंबादे,संकेत कालेजवार,विकी गुरनुले,शिवांश शर्मा, गुरप्रीत कंग,पवन जाधव इत्यादि म्हाडा कॉलोनी युवक गणेश मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.