Click Here...👇👇👇

संगणक परिचालक वेतनाच्या प्रतिक्षेत, पाच महिन्यापासून मानधन रखडले.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Sep 09, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) किशोर माहोरकर फुटाना, पोंभुर्णा
पोंभुर्णा:-  महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमतून सन २०११ पासून संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्रात अर्थात संग्राम व सध्या सुरु असलेले आपले सरकार सेवा केंद्र चालविण्यात येत आहे. या प्रकल्पात राज्यतील सर्व  पंचायत राज संस्था मधे संगणक परिचालक काम करीत आहेत. परंतु यांचे मानधन मागिल सहा महिन्यापासून प्रलंबित आहे.
              डिजिटल महाराष्ट्रसाठी सध्या पंचायत समिती, ग्राम पंचायत मधे कार्यरत संगणक परिचालक कोरोना च्या महामारीत अविरत कार्य करीत आहेत. गावातील जे मिनी मंत्रालय म्हणून ओडखले जाते. ज्यातून गावाचा विकास आराखडा तयार केल्या जातो व २१ प्रकारचे दाखले या कार्यालयातून दिले जातात. परंतु त्यासाठी लागनारी स्टेशनरी सुधा नियमित मिळत नाही. ही खुप शोकांतिका आहे. संपूर्ण राज्यात यंत्रना राबविण्यासाठी एका खास कंपनी ची नियुक्ति करण्यात आली आहे. परंतु या कंपनी कडून नेहमीच मानधन, स्टेशनरी, या बाबतीत संगणक परिचालक लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिचालक संघटनेने कंपनी कड़े वारंवार पाठपुरावा केला परंतु वेळ मारून नेण्यात येत आहे. एप्रिल महिन्यापासून  परिचालक लोकांचे मानधन न झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी संगणक परिचालकाचे मानधन त्वरित काढून त्यांची आर्थिक कोंडीतून सुटका करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.