दि महाराष्ट्र अर्बन च्या ७व्या वर्धापन दिना निमित्य मोफत मास्क चे वितरण.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Sep 01, 2020
   
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- दिनांक 1 सप्टेंबर 2020 ला दि महाराष्ट्र अर्बन को ऑप-क्रेडिट सो.ली.चंद्रपुर, सावली चा सातवा वर्धापन दिन समारंभ हा कोविड19 मूळे अत्यंत साधे पणात संपन्न झाला.तसेच या निमित्याने दरवर्षी चे विविध कार्यक्रम हे सर्व कार्यक्रम रद्द करून फक्त आजपासून संस्थेत येणाऱ्या सर्व ग्राहक व सभासदांना मोफत मास्क चे वाटप करण्यात आले. सोशल डिस्टन ठेवून या छोट्याखाणी संपन्न झालेल्या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चरणदास बोम्मावार होते.तर संचालक ऍड.धनंजय आंबडकर,अनुराग सुरमवार, मंगला बोम्मावार उपस्तीत होते. यावेळी दैनिक अभिकर्ता यांना मशीन चे वाटप करण्यात आले तर उपस्तीत ग्राहकांना व सभासदांना मोफत मास्क चे वितरण करण्यात आले.1 सप्टेंबर पासून या संस्थेच्या सर्व ग्राहकांना मोफत मास्क देण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले.या कार्यक्रमाचा संचालन व्यवस्थापक सूरज बोम्मावार यांनी केले तर आभार कविता तावडे यांनी मानले.यावेळी योगेश सातरे,आरजू बोम्मावार, किरण गावडे,आशिष गेडाम,निलेश पुल्लावार,रुपेश येनूरवार, सत्यवान मांदाळे,गिरीधर मेश्राम,लोकनाथ भोयर,प्रफुल लाटकर,उल्हास डोंगरे यांनी कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.आज 500 ग्राहकांना मोफत मास्क वितरण करण्यात आले.