Top News

घुग्घुस भाजपाच्या वतिने पं. दिनदयाल उपाध्यायजी यांच्या जयंती निमित्त महिलांना छत्र्यांचे वितरण.


पंडीतजींनी अंत्योदयाचा संदेश दिला:- चंद्भाजपा जिल्हाअध्यक्ष देवराव भोंगळे यांचे प्रतिपादन.

सोशल डिस्टंसिंग च्या नियमाचे पालन करण्यासाठी केला छत्रीचा वापर.
Bhairav Diwase. Sep 27, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- घुग्घुस येथे भारतीय जनता पार्टी तथा मा. आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने प्रयास सभागृहात एकात्म, मानववाद, अंत्योदयाचे प्रणेते पं.दिनदयाल उपाध्यायजी यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपुर भाजपा जिल्हाअध्यक्ष देवराव भोंगळे होते. 

 यावेळी पं.दिनदयालजी उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करुन अभिवादन करण्यात आले. प्रत्येक प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या घराच्या छतावर भाजपाचा ध्वज लावण्यात आला. प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी एका गरीब कुटुंबास धान्य किटचे वाटप केले.


               यावेळी चंद्रपुर भाजपा जिल्हाअध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले पं. दिनदयाल उपाध्यायजी एकात्म मानववाद, अंत्योदयाचे प्रणेते होते. चंद्रपुर जिल्ह्यात भाजपा कार्यकर्ते आपल्या क्षमते प्रमाणे गोर गरीबांना मदत करीत आहे व स्वत:च्या घराच्या छतावर भाजपाचा ध्वज लावुन, पंडीतजींच्या प्रतिमेस अभिवादन करुन त्यांची जयंती साजरी करीत आहेत. अश्या प्रकारचे कार्यक्रम आम्ही जिल्ह्याभर करीत आहोत. पं. दिनदयाल उपाध्यायजी यांनी अंत्योदयाचा संदेश दिला, त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही गोर गरीबांना विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्याचे काम आम्ही करीत आहोत.*

                  *या प्रसंगी भाजपा शहर अध्यक्ष विवेक बोढे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना माननीय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र नेहमी आपल्या सेवेसाठी तयार आहे. आपण सर्वांनी या केंद्राचा लाभ घ्यावा.*

     *गोरगरीब स्त्रियांना माननीय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यावतीने छत्र्यांचे वाटप करण्यात आले.*

*सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन करण्यासाठी छत्रीचा वापर कल्पकतेने करण्यात आला*
मंचावर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे, जि. प. सभापती नितुताई चौधरी, ग्रामपंचायत सदस्य संजय तिवारी, प्रकाश बोबडे, साजण गोहणे, पूजा दुर्गम, कुसुमताई सातपुते, वैशालीताई ढवस, नंदाताई कांबळे, वसुधाताई भोंगळे, रेखाताई पाटील, मल्लेश बल्ला, सुरेंद्र भोंगळे, प्रवीण सोदारी, अजय आमटे, अमोल थेरे, शरद गेडाम, नितीन काळे, अजगर खान, कोमल ठाकरे, सिणू कोत्तुर उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयास पतसंस्थेच्या अध्यक्षा किरणताई बोढे, निषाताई उरकुडे, सूनिताताई पाटील, रजियाताई कुरेशी, सिमाताई पारखी यांनी प्रयत्न केले.
                       कार्यक्रमाचे संचालन ग्रामपंचायत सदस्य सूचीताताई लुटे यांनी केले तर आभार सूनंदाताई लीहितकर यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने