परिसरातील ही तिसरी घटना यापूर्वीही गेले दोन बालकांचे जीव.
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील अष्टभुजा वार्डमधील रमाई नगर येथे दिनांक 26/9/2020 रोजी शनिवार ला दुपारी अंदाजे 4 वाजता रमाई नगर येथील निवासी विलास बागडे यांचा 13 वर्षीय मुलगा मंगेश बागडे यांचा परिसरातील विटाभट्टी च्या विस्तीर्ण खड्ड्यात साचलेल्या पाण्यात डुबून करून अंत झाला. सदर मृतदेह रात्री अंदाजे 9.30 वाजता बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालय चंद्रपूर येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
मृतक बालक मंगेश बागडे व त्यांचे समवयस्क मित्र यश सिद्धार्थ बोरकर व सुमित सिध्दार्थ बोरकर हे तिघेही सदर पाणी साचलेल्या खड्डयात आंघोळ करण्याकरिता गेले असता पाण्याच्या पातळीचा अंदाज न लागल्याने मंगेश खोल पाण्यात गेला व त्याला पोहता येत नसल्याने त्याचा तिथेच डुबून अन्त झाला.या प्रकारामुळे सोबत असणारे त्याचे मित्र घाबरून घटनास्थळावरून पळ काढला सदर घटनेची त्यांनी कोणालाही माहिती दिली नाही.
मुलगा घरी नसल्याचे पाहून आई-वडिलांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु शोध लागला नाही, अखेर त्यांच्या मित्रांना नानातर्हेचे प्रलोभने देऊन त्यांच्याकडून माहिती काढण्यात आली. तेंव्हा मंगेश पाण्यात डुबून मरण पावला असल्याचे त्यांनी सांगितले सदर घटनेची माहिती पोलिस प्रशासनाला देण्यात आली. रात्री उशिरा प्रेत पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले.
सदर परिसरात विटा भट्टी खड्ड्यातील पाण्यात डुबून मरण्याची ही तिसरी घटना आहे. असे अनेकांचे बळी गेले आहेत या गंभीर बाबीची दखल प्रशासनाने घ्यावी असे मृतकाचे वडील विलास बागडे, किशोर निगडे तसेच सामाजिक कार्यकर्ते व सिद्धार्थ बहुद्देशिय सेवा मंडळ रमाबाई नगर यांचे अध्यक्ष गोवर्धनजी डोंगरे यांनी इंडिया दस्तक न्यूज टीव्हीच्या प्रतिनिधी समोर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.