बेलघाटा येथे जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांचे हस्ते वितरण.
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव डी दिवसे जिल्हा चंद्रपूर
चंद्रपूर:- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान, नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मूल तालुका भाजपा ग्रामीण यांच्या तर्फे सेवा सप्ताह अंतर्गत जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांचेहस्ते आज बेलघाटा येथे नोटबुक वाटप कार्यक्रम पार पडले. यावेळी त्यांसमवेत, पंचायत समिती मुल चे सभापती चंदू भाऊ मारगोणवार, मुधोळकर मॅडम, दुधे सर, तोडासे मॅडम, यशोधरा त्रिपात्तीवार, अजय त्रिपात्तीवार, सौरभ तरारे युवा कार्यकर्ते, सौ उर्मिलाताई कडस्कर माजी सरपंच चिखली, देविदास पित्तलवार माजी उपसरपंच, यांसह जिल्हा परिषद चे विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते.