केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन.


Bhairav Diwase.  Sep 23, 2020


भारत:- केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच कोरोना मुळे निधन झालं. पहिल्यांदाच भारताचे केंद्रीय मंत्री कोरोना ला बळी पडले आहेत. अंगडी यांच्यावर गेले 2 आठवडे उपचार सुरू होते. बेळगावचे खासदार असलेले सुरेश अंगडी पहिल्यांदाच मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषवत होते. 11 सप्टेंबरला सुरेश अंगडी यांनी Tweet करून आपल्याला कोरोना चा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अंगडी यांना दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे बुधवारी सायंकाळी एम्स रुग्णालयात निधन झाले. या घटनेचे वृत्त समजताच बेळगावकरांना धक्काच बसला. सलग चारवेळा ते बेळगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. काही दिवसापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. २०१९ साली त्यांना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रीपद देण्यात आले होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या