बंगाली कॅम्प परिसरातील बिस्वास पोल्ट्री सप्लायर मध्ये ग्राहकांची तुफान गर्दी!
कोरोना संक्रमनाची साखळी कशी तुटेल?
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- आज रविवार दि. २७ रोजी स्थानिक बंगाली कॅम्प परिसरातील बिस्वास पोल्ट्री सप्लायर सुरू होते. या दुकानात चिकन घेण्यासाठी ग्राहकांनी तौब्बा गर्दी केली होती. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्हात २५ तारखेपासून सात दिवसांचा जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे. कोरोना संक्रमनाची साखळी तोडण्यासाठी हा जनता कर्फ्यु लावण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी महोदयांकडून सांगण्यात आले आहे. सर्वसामान्य माणूस या जनता कार्फ्युला वेळेवर पडत आहे तर काही धनदांडग्यांनी आपला रोजगार सांभाळत आहेत हा कुठला न्याय असं विचारण्याची वेळच सामान्य गोरगरीब जनतेवर आली आहे.
चंद्रपुरात दिवसेंदिवस बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात मृतकांची ही भर पडत आहे. त्यामुळे जनता कर्फ्यु हा एकमेव पर्याय अशे सांगून सात दिवसाचे जनता कर्फ्यू लावण्यात आला. परंतु काही मोजकी व्यवसायिक या जनता कर्फ्यु चा धुवा उडवत असल्याचे हे चित्र आहे. प्रशासनाने यावर त्वरित रोख बसवावा जनता कर्फ्यू सारखे प्रयोग करून सामान्य गोरगरिबांना मेटाकुटीस आणू नये अशी मागणी आता होऊ लागली आहे.