Click Here...👇👇👇

जिवती पंचायत समिती सभापती सौ अंजना पवार यांच्या हस्ते तांडा वस्तीच्या कामांचे भूमिपूजन.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Sep 10, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुक्यातील दमपुर मौदा ग्राम पंचायत येथे तांडा वस्तीच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले यात भूमिपूजन म्हणून जिवती पंचायत समितीच्या सभापती सौ.अंजनाताई भिमराव पवार व पंचायत समिती सदस्य गोतावळे मॅडम यांच्या हस्ते कामाचं शुभारंभ करण्यात आले या वेळी जिल्हा परिषद सदस्य सौ.कमलताई दत्ता राठोड, दमपुर मौदा ग्रामपंचायतीच्या सरपंच बायनाताई अंबादास राठोड, गोतावळे सर, केशव पाटील गिरमाजी व ग्रामपंचायत सदस्य उत्तम पवार,  नारायण वाघमारे व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.