Click Here...👇👇👇

आंबेधानोरा येथे हेल्पिंग हँड ग्रुप व मावा नाटे मावा यांच्या तर्फे रक्तदान शिबिर आयोजित.

Bhairav Diwase
हेल्पिंग हँड ग्रुप व मावा नाटे मावा हे सामाजिक कार्यात अग्रेसर.
Bhairav Diwase. Sep 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- राज्यासह देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या. शिवाय संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने कायद्याचा बडगा आहेच. नागरिक घरातच अडकून असल्याने रक्तदातेही मोठ्या संख्येने घटले होते . त्यामुळे विविध आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना आवश्यक असणारा रक्तपुरवठा कमी झाला होता. रक्ताचा वाढता तुटवडा लक्षात घेता. हेल्पिंग हँड ग्रुप व मावा नाटे मावा यांचेकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

आज पोंभुर्णा तालुक्यातील आंबेधानोरा येथे हेल्पिंग हँड ग्रुप व मावा नाटे मावा यांचेकडून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून हेल्पिंग हँड ग्रुप व मावा नाटे मावा हे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.

तरी या रक्तदान शिबिरात 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या वेळेस जि.प. सदस्य राहुलभाऊ संतोषवार व चिंतामणी कॉलेज चे प्राचार्य हुंगे सर व इतर प्राध्यापक यांनी भेट देऊन प्रोत्साहन दिले. आणि हेल्पिंग हँड ग्रुप चे अध्यक्ष श्रीकांत शेंडे, सचिव शिवम जुमनाके व मावा नाटे मावा राज चे अध्यक्ष नंदू जुमनाके यांनी सामान्य रुग्णालय रक्तपेटी व चमू, सर्व रक्तदात्यांचे आभार मानले व त्या सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व टी-शर्ट वितरित करण्यात आले.