शिवसेनेचा रौद्ररुप कंगणा राणावतचा जाडला पुतळा.

Bhairav Diwase
कंगणा राणावतने मुंबईतच काय तर महाराष्ट्रात कुठेही पाय ठेऊ नये:- जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे 

कंगना राणावत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची शिवसेनेची मागणी.
Bhairav Diwase.    Sep 04, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपुर:- मुंबई पाकव्याप्त झाल्यासारखे वाटते;असे व्यक्तव्य करुण अभिनेत्री कंगणा राणावतने मुंबई पोलिसांची सुरक्षा सुध्दा नाकारली होती.पोलिसांबदल अपमान जनक व्यक्तव्य करणार्या अभिनेत्री राणावत च्या विरोधात शिवसेनेने जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वात अभिनेत्री कंगना रणावतच्या पुतळयाचे दहन शिवसेना जिल्हा कार्यालयसमोर करण्यात आले. ज्या  मुंबई मधे राहून  पैसा, प्रसिद्धि आणि नाव कमविले त्या मुंबईची आणि पोलिसांची बदनामी कारित आहे. आता तर कंगना रानावतच्या पुतळा जाळला यानंतर तिने महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची माफी मागितली नाही तर यानंतर कंगना रानावतचे चित्रपट चंद्रपुर मध्ये प्रसिद्ध होऊ देणार नाही असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांनी दिला आहे.
       यावेळी शिवसेना महानगर प्रमुख प्रमोद पाटील, शिवसेना महिला आघाडीचे भारतीताई दुधानी, युवासेनेचे आशिष कावटवार, राहुल विरुटकर, महिला आघाडीचे मायाताई पटले, वर्षाताई कोठेकर, कुसुमताई उदार, शोभाताई वाघमारे, अशोक चिरखरे,हर्षल कानल्लीवार, सोनू ठाकुर, हेमराज बावणे, करण वैरागड़े, सिकंदर खान, वसीम खान, देवा इंगोले, विक्रम सहारे, अक्षय अंबिवार, विश्वास इटनकर, अजय मोटवानी, राहुल पायघन, सुरेश नायर, व शिवसैनिक,युवासैनिक,महिला आघाडीच्या पदाधिकारी,कार्यकर्ते  उपस्थित होते.