(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष राजू देवगडे यांचा पॅरालाईज, हार्ट अटॅकने मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते , आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नुकतेच काही दिवसांपूर्वी त्यांनी चंद्रपूर शहरात भीम आर्मीच्या जिल्हा कार्यालयाचे उदघाटन सुद्धा केले होते. त्यांच्या जाण्याने आंबेडकरी जनता व भीम आर्मीचे कार्यकर्ते दुःख व्यक्त करीत आहे.