डॉ. मोरे यांच्या वादग्रस्त जागेवर.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सरळ सेवा भरती प्रक्रियेतुन नियुक्ती.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- WHO चे जागतिक तज्ज्ञ डॉ. अरुण हुमणे यांचीं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर चे नवे अधिष्ठाता म्हणून नियुक्त झाले आहेत . मावळते अधिष्ठाता डॉ . एस.एस. मोरे यांची कारकीर्द कोरोना नियंत्रणातील अव्यवस्थेने गाजली. सततच्या तक्रारीनंतर डॉ. मोरे यांना हटविण्याची सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी मागणी केली होती. त्यानंतर लोकसेवा आयोगाने सरळ सेवा भरती प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतून डॉ. हुमणे यांची निवड केली. दरम्यान, डॉ . हुमणे आज पदभार स्वीकारण्याची शक्यता असून 10 हजार रुग्णांकडे होणारी जिल्ह्याची वाटचाल रोखणे सोबतच डॉक्टर्स कर्मचारी यांची रिक्त पदे भरून रुग्णदिलासा देणे हे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे.