चंद्रपूर सैनिक शाळा प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 20 ऑक्टोंबर पासून सुरु.

Bhairav Diwase
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 19 नोव्हेंबर.
Bhairav Diwase. Oct 15, 2020


(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा शैक्षणिक सत्र 2021-22 साठी सैनिक शाळा चंद्रपूर येथे प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 20 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होत आहे.ऑनलाईन अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख 19 नोव्हेंबर 2020 आहे. परीक्षा 10 जानेवारी 2021 रोजी होईल. विद्यार्थ्यांच्या पालकांनी याची दखल घेऊन ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन सैनिकी शाळेचे स्कॉड्रन लीडर नरेश कुमार यांनी केले आहे.

एआयएसएसईई-2021 ही राष्ट्रीय चाचणी  एनटीए संस्थेमार्फत घेतली जाईल. उमेदवार फक्त https://aissee.nta.nic.ac.in वर ऑनलाईन अर्ज करू शकतात. परीक्षेशी संबंधित माहिती, रिक्त जागा, परीक्षेचे वेळापत्रक व पात्रता निकष बुलेटिनमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. जी www.nta.ac.in  या  वेबसाईट वर उपलब्ध आहे. उमेदवार एनटीए  वेबसाइटवर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरसूची मिळवू शकतात.