घुग्घुस पोलीसांना अवैध रेती तस्करी होत असल्याची मिळाली होती माहिती.
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस
चंद्रपूर:- आज सकाळी १० वाजतााच्य सुमारास घुग्घुस पोलीसांना अवैध रेती तस्करीची होत असल्याची माहिती मिळताच वर्धा नदीच्या घाटावर धाड टाकुन तिन ट्रँक्टर जप्त केले.
घुग्घुस पोलीसांनी ट्रँक्टर चालक महेश वसंत कामतवार (२४) रा. अमराई, घुग्घुस व मारोती नानाजी मोहुर्ले (२५) रा. अमराई, घुग्घुस यांच्यावर कलम ३७९ चा गुन्हा दाखल करुन केली असुन ट्रँक्टर मालक पिंटु विश्वनाथन लोढे व विजय सिंग फरार आहे.
२ ट्रँक्टर व २ ट्राली आणी २ ब्रास रेती असा एकुण १० लाख १० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एक ट्रँक्टर ओबीचे असल्याने दंड वसुल करण्यात येनार आहे. हि कारवाही सहा.पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ नागलोत, किशोर रिंगोले यांनी केली आहे.