Top News

घुग्घुस येथील प्रयास अर्बन को-ऑपरेटिव क्रेडीट सोसायटीच्या वतिने महात्मा गांधी यांची जयंती साजरी.



अहिंसा हे वैचारिक परिवर्तन घडविनारे प्रभावी अस्त्र:- सौ.किरणताई बोढे.
Bhairav Diwase. Oct 03, 2020


(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस
चंद्रपूर:- २ ऑक्टोंबरला घुग्घुस येथील प्रयास अर्बन को-ऑपरेटिव क्रेडीट सोसायटीच्या वतिने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५१ वी जयंती साजरी करण्यात आली.

घुग्घुस येथील प्रयास को-ऑपरेटिव क्रेडीट सोसायटीच्या अध्यक्षा सौ.किरणताई विवेक बोढे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमे पुष्पहार अर्पन करुन अभिवादन केले.

यावेळी घुग्घुस प्रयास अर्बन को-ऑपरेटिव क्रेडीट सोसायटीच्या अध्यक्षा सौ.किरणताई विवेक बोढे म्हणाल्या आज २ आॅक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचा दिवस जागतिक अहिंसा दिवस म्हणुन साजरा करण्यात येते. महात्मा गांधी हे संपुर्ण जगाला सत्य व अहिंसेचा संदेश देनारे होते.
१९२० ते १९४७ पर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत अहिंसक चळवळ उभारली. अहिंसा से अतिशय प्रभावी शस्त्र आहे हे गांधीजींनी दाखवुन दिले. अहिंसा से वैचारिक परिवर्तन घडविनारे प्रभावी अस्त्र आहे.
महात्मा गांधीजी विश्वातील असे महात्मा होऊन गेले कि जे अत्यंत साधेपणाने राहिले व समाजावर निरपेक्ष प्रेम करीत राहिले. दक्षिण अफ्रीका व भारत या दोन्ही देशांच्या मुक्तिलढ्यात त्यांचे योगदान मोठे आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी चंद्रपुर जि. प महिला व बालकल्याण सभापती सौ. नितुताई चौधरी, माजी ग्रापं सदस्या सुचिता लुटे, निशाताई उरकुडे, शुभश्री किनेकर, सुनंदा लिहितकर, वसुधा भोंगळे प्रिती धोटे, प्रणाली पाटील, सोनु बहादे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने