तस्करी करणारे दोघे ताब्यात; चौघे जण फरार.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- तेलंगणा सिमेलगत असलेल्या भंगाराम तळोधी येथे दारू तस्करांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पकडण्यात आलेली दारू माजी पंचायत समिती सदस्याची असल्याचे आरोपींनी बयाणात सांगितले. बयाणावरूण माजी पं. स. सदस्य सिनु कंदनुरीवार याचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यवाहीत दोन लाखांचा दारूसह मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून चौघे फरार असल्याची माहीती आहे.
गोंडपिपरी तालुक्यात छुप्या मार्गाने अवैध दारूची तस्करी सूरू आहे. तालुक्याला लागुन तेलंगणा राज्याची सीमा आहे. तेलंगणातून मोठ्या प्रमाणात तालुक्यात दारू येत असल्याचे बोलले जाते. अश्यातच सोमवारचा रात्री वर्धा नदीच्या घाटावरून नंदवर्धन-अडेगाव मार्गे येणाऱ्या एका दुचाकी मध्ये दारू येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. माहितीचा आधारावर स्थानिक गुन्हे शाखेचा पथकातील संदीप इंगोले, शुभम येडस्कर व अन्य सहकाऱ्यांसह नंदवर्धन-अडेगाव मार्गावर पाळत ठेऊन होते. रात्रीच्या सुमारास एक संशयास्पद दुचाकी ( क्रमांक MH34 AG 3662 ) येताना पथकाला दिसली. दुचाकीला थांबवून चौकशी केली असता तेलंगणा येथील विदेशी दारू आढळून आली. यात दोन आरोपींना पकडण्यात पथकाला यश आले तर चार आरोपी फरार झाले आहेत. घटनास्थळी सापडलेल्या दुचाकीच्या चौकशीअंती विदेशी दारू सह एकूण 2,17,000 रुपया किमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने जप्त केला आहे. सदरील अवैध दारूसाठा हा भंगाराम तळोधी येथील सिनु कंदनुरीवार यांचा असल्याचे आरोपीचा बयाणातून स्पष्ट झाले आहे. सिनु कंदनुरीवार हे माजी पंचायत समिती सदस्य राहीले आहेत. अनेक राजकीय पक्षांशी त्यांची जवळकी आहे. दरम्यान पुढील तपास धनंजय करकाडे, संजय आतकूलवार, गोपाल अनकूलवार, नितेश महात्मे, प्रशांत नागोसे, करीत आहे. तालुक्यात अवैध दारूच्या होत असलेल्या कार्यवाहीने दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.