उमरी पोतदार येथील ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांंचा निरोप समारंभ संपन्न.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Oct 20, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- ग्रामपंचायत उमरी पोतदार येथे आज सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला. ग्राम पंचायत उमरी पोतदार येथील पदाधिकारी यांचा कार्यकाळ 22 ऑक्टोबर 2020 रोजी समाप्त होत असल्याने, सरपंच सौ. वनिता सिडाम उपसरपंच श्री. मनोज मुलकलवार, श्री.बंडू लेनगुरे सदस्य, सौ. टामेश्वरी लेनगुरे सदस्य, सौ.जया मेश्राम सदस्य, सौ. मीनाक्षी कुंभरे सदस्य यांना ग्रामपंचायत चे सचिव श्री. एस. बि. कंबलवार यांनी सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी यांना शाल व श्रीफळ देऊन निरोप देण्यात आला.
    निरोप समारंभ म्हणजे क्षनोक्षणी डोळ्यांचा कडा ओलावणारा प्रसंग आहे. मागील पाच वर्षांत उमरी पोतदार गावाचा झपाट्याने विकास झालेला असून यामध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी यांचा सिहांचा वाटा असून येथे विविध लोकाभिमुख कार्यक्रम मागील पाच वर्षात राबविले आहे. 

       यावेळी कार्यक्रमाला ग्रामपंचायत कर्मचारी राकेश मडावी, संगणक परिचालक नमलेश तावाडे उपस्थित होते