Bhairav Diwase. Oct 20, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- मिळालेल्या माहितीनुसार सुरेश लक्ष्मण सोयाम रा घनोटी तुकुम माजी पोलीस पाटील वय अंदाजे 60 वर्ष हे विहिरगाव कडे शेती असल्यामुळे ते आपल्या शेताकडे साईकल ने जात होते. पोंभुर्णा कडून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्यानेे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घनोटी तुकूम- विहिरगाव या मार्गावर ही घटना 12:20 वाजताच्या सुमारास घडली, असून शवविच्छेदना करीता पोंभुर्णा येथे नेण्यात आले आहे व पुढील तपास उमरी पोतदार पोलिस करत आहे.