गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील कोत्तापल्ली येथे प्रेमसंबंधाचा थरारक शेवट झाला आहे. दोन प्रियकरांनी मिळून आपल्या प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी प्रमोद जाडी आणि समय्या दुर्गम यांना अटक केली आहे. त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
मृत 30 वर्षीय ही महिला आपल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर माहेरात राहत होती. तिने आपली मुले वडिलांकडे सोडली होती. माहेरी आल्यानंतर तिचे प्रमोद जाडी याच्याशी प्रेमसंबंध सुरू झाले. मात्र काही काळानंतर समय्या दुर्गम याने आयुष्यात प्रवेश केला. त्यामुळे ती प्रमोदला टाळायला लागली. यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. प्रमोद जाडी याने रिताला वारंवार फोन केला, पण तिने कॉल घेतला नाही. दुसरीकडे समय्या दुर्गम हा देखील ती प्रतिसाद देत नसल्याने रागात होता. तिची आई मोठ्या लेकीकडे हैद्राबादला गेली होती. त्यामुळे रिता घरी एकटीच होती. यावेळी त्या दोघांनी मिळून रिताचा गळा दाबून काटा काढला. रिताच्या आईच्या फिर्यादीवरुन असरअल्ली ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. प्रमोद आणि समय्या यांची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.