Chandrapur police: देशी कट्टा आणि जिवंत काडतुसासह आरोपीला अटक

Bhairav Diwase

चंद्रपूर:- दिनांक १७ मे २०२५ रोजी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदिप बच्छिरे यांना त्यांच्या खबऱ्याने माहिती दिली की, राजनगर, सहारा पार्क, आरवट रोड येथे एक व्यक्ती देशी कट्टा आणि जिवंत काडतुसे घेऊन येणार आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांना माहिती देण्यात आली. त्यांच्या निर्देशानुसार, पोउपनि बच्छिरे आणि डी.बी. पथकाने तात्काळ आरवट येथे सापळा रचला. या कारवाईत पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एक देशी बनावटीचा कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

आरोपीविरुद्ध चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ३५१/२०२५, कलम ३, २५ भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव रोहित उर्फ मोनू राजकपूर कातकर (वय २४ वर्षे, रा. विचोडा रयतवारी, पोस्ट पडोली, ता. जि. चंद्रपूर) असे आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रीना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव आणि पोलीस निरीक्षक प्रभावती ऐकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोउपनि संदिप बच्छिरे, पोहवा सचिन बोरकर, पोहवा भावना रामटेके, संजय धोटे, संतोष कनकम, नापोअ कपूरचंद खरवार, पो.अं. विक्रम मेश्राम, पोअ रूपेश पराते, इम्रान खान, दिलीप कुसराम, इर्शाद खान, सारीका गौरकर आणि दिपीका झिंगरे यांनी केली. पुढील तपासणी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजें सोनवने करत आहेत.