गोंदिया:- जिल्हा परिषद सदस्य सविता संजय पुराम व मित्र परिवार तसेच माँ धुकेश्वरी सार्वजनिक मंदिर समिती देवरी तर्फे पुराडा येथील शासकीय आश्रम शाळा प्रांगणात आदिवासी सामूहिक विवाह सोहळा आज होणार आहे.
या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शनिवारी १७ मे ला सायं. ७:०० वाजता मंडप पूजन व प्रसिद्ध आदिवासी गीत गायक राजू उईके नागपूर यांचा गोंडीयन आर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला होता.
या निमित्ताने हळदीच्या कार्यक्रमात देवरी-आमगावचे आमदार संजय पुराम यांनी आपल्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य सविता पुराम यांच्यासह आदिवासी बांधवांच्या सुरू असलेल्या सामूहिक नृत्यात दोघांनी ठेका धरला.
सुरुवातीला सामूहिक नृत्यात आमदार संजय पुराम यांनी एकटेच नृत्य केले पण नंतर या आदिवासी सामूहिक सोहळ्यात उपस्थित समाज बांधवांच्या आग्रहाखातर आमदार पत्नी सविता पुराम यांनीही आपल्या पतीसोबत सामूहिक नृत्यात सहभागी होऊन आदिवासी नृत्याचा आनंद लुटला.