Sand thief : चक्क! ग्राम पंचायत सदस्य निघाला रेती चोर!

Bhairav Diwase

भद्रावती:- चंद्रपूर जिल्ह्य़ातील भद्रावती तालुक्यातील मांगली गावातील थेट रेती घाटात जाऊन महसूल पथकांनी माजी सरपंच तथा तत्कालीन ग्राम पंचायत सदस्य घनश्याम उताने यांचे मांगली घाटातून रेती चोरट्या मार्गाने चोरून विक्री करण्यापूर्वीच भद्रावतीचे महसूल विभागांनी कोणाचाही दबावला न जुमानता ताब्यात घेवुन मुसक्या आवळल्या असल्याची खात्रीशीर माहीती प्राप्त झाली.

तत्पुरवी विविध बांधकाम कामासाठी रेतीची आवश्यकता आहेत. प्रसंगी ईतर बांधकाम करण्यासाठी रेतीची आवश्यक असणार्या नागरीकांनकडून अव्वाचा सव्वा दराने अवैध रेती उत्खनन करून विकसित तंत्रज्ञान वापरून चोरट्या मार्गाने विकतात. तसेच रेती घाटातून चांगला मलींदा खाऊन गब्बर होण्यास व्यस्त असणारे सफेद काॅलर स्वयंघोषित नेतेच आहेत.
तत्कालीन ग्राम पंचायत मांगली येथील सदस्य यांचा रेतीचा व्यवसाय कितीतरी वर्षांपासून घाटातून रेती उत्खनन करून वाहाम मार्गाने विकण्याचा पण असल्याची खात्रीशीर माहीती सूत्रानुसार प्राप्त झाली. सदरील कारवाई झालेल्या ताब्यात ट्रॅक्टर मालकाचे मुख्य काम नवखे व्यवसायीक "मी" अमुक पक्षाचे तमुख पक्षाचे रेती उत्खनन करणारे चोरट्यांना गावातील अवैध मार्गाने रेती वाहतूक करीत असल्याबद्दलची माहीती सबंधित प्रशासनाला देण्याचे. हा सर्व खटाटोप कशासाठी आपले मधुर सबंध काही जवळील बेरक्या नारदांना देऊन कटोर कारवाई करण्यात भाग पाडुन स्वतःच गब्बर होण्यासाठीच फक्त.
मात्र खात्रीशीर माहितीनुसार तहसीलदार राजेश भांडारकर यांनी कठोर कारवाई करण्याचा बडगा उगारुन अवैधरीत्या रेती चोरट्यांवर आळा घालण्यात कसोशीने प्रयत्न करीत असल्याची माहीतीवरुन तालुक्यातील अवैधरीत्या कोणत्याही घाटातून रेती उत्खनन करून वाहतूक करणार्याविरूध्द कारवाई करणारच तसेच आपल्यागाव ग्रामीण भागात अवैध रेती तस्करीवर आळा घालण्यात महसूल विभाग तत्पर सज्ज असल्याची पण माहीती सूत्रानुसार प्राप्त झाली.
       
प्रासंगिक तहसीलदार भांडारकर यांनी नेमणूक करण्यात आलेल्या कर्तव्यदक्ष पथकांनी मांगली गावालगत घाटातील गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार शिताफीने छापा टाकून एक ट्रॅक्टर ताब्यात घेत दंडात्मक कारवाई करीत तहसिल कार्यालय भद्रावती येथे एक रेतीसह ट्रॅक्टर MH 34 CD 0112 ताब्यात घेत दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश सदरील पथकाला दिले.
        ही कारवाई राजेश भांडारकर यांचा नेतृत्वात पथक प्रमुख नायब तहसीलदार संतोष खांडारे, मंडळ अधिकारी मस्के, ग्राम महसूल अधिकारी संदिप मुरकुटे यांनी केली.

आधार न्युज नेटवर्क/ जितेंद्र माहूरे, भद्रावती