Accident News: दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू ;दोघे गंभीर जखमी

Bhairav Diwase

पोंभूर्णा:- तालुक्यातील उमरी पोतदार येथील पांढऱ्या माती परिसरातील हनुमान मंदिराजवळ दोन दुचाकीच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला.तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.सदर घटना दि.१५ मे रोजी गुरूवारला सकाळी ९.३० वाजता घडली.केजराज मोगरकार वय (४५) रा.देवाडा खुर्द,ता.पोंभूर्णा असे मृतकाचे नाव आहे.तर गंभीर जखमींमध्ये समीर सोमनकर वय (२८) रा.देवाडा खुर्द,व अमीन सिडाम वय (२५) रा.कवडजई,ता.बल्लारपूर यांचा समावेश आहे.

कुडेसावली येथील आश्रम शाळेत प्रयोगशाळा सहाय्यक पदावर काम करणारे केजराज मोगरकार व चौकीदार असलेले समीर सोमनकार हे दोघे आपल्या टुव्हिलर क्र.(MH-34-AW-7465) ने सकाळी ९ वाजताच्या सुमारास कुडेसावली येथून देवाडा खुर्द गावाकडे येत होते तर उमरी पोतदार येथून अमीन सिडाम आपल्या कवडजई गावाकडे टुव्हिलर क्र.(MH-34-CH-0686)ने जात असताना उमरी पोतदार गावानजीकच्या पांढऱ्या माती परिसरातील हनुमान मंदिराजवळ दोन्ही टुव्हीवरची जबर धडक झाली.यातील केजराज मोगरकार, समीर सोमनकार व अमीन सिडाम यांना तत्काळ पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र केजराज मोगरकार याला डॉक्टरांने मृत घोषित केले.तर गंभीर जखमी असलेले समीर सोमनकार व अमीन सिडाम यांना चंद्रपूरला रेफर करण्यात आले.घटनेचा पुढील तपास उमरी पोतदार पोलीस करीत आहे.
मृतक केजराज मोगरकार यांच्या पश्चात पत्नी,आई,वडील व दोन मुली आहेत.देवाडा खुर्द गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.