लोहट कुटुंबीयांना आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते एक लाखाची मदत.

Bhairav Diwase
महावितरण कंपनीकडून आणखी चार लाख रुपयांची मदत लवकरच. 
Bhairav Diwase.    Oct 19, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील मौजा चिंचोली बु.  येथील शेतकरी मारुती लोहट यांचा महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. सदर प्रकरणाची योग्य ती चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि मृताच्या वारसांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी, याकरिता राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार  सुभाष धोटे यांनी राज्याचे उर्जा मंत्री माननीय नितीन राऊत साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला. तसेच मृताच्या वारसांना योग्य मोबदला देण्याबाबत मागणी लावून धरली. आमदारांच्या प्रयत्नातूनच मारुती  लोहट यांच्या वारसांना महावितरण कंपनी कडून तात्काळ मदत म्हणून एक लाख रुपये राशी प्रदान करण्यात आली. तसेच महावितरण कंपनीच्या नियमाप्रमाणे चार लाख रुपयांची नुकसान भरपाई मृताच्या वारसांना देण्यासंबंधी योग्य ती कायदेशीर कारवाई  करून न्याय मिळवून दिला जाईल, असे लेखी आश्वासन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून आजच्या शिष्टमंडळाला देण्यात आले.