घुग्गुस येथे भारतीय लाँयड्स मेटल कामगार संघाचे अध्यक्ष राजन्ना महाकाली चा वतीने त्रिवार्षिक अधिवेशन संपन्न.

Bhairav Diwase
भाजपा भारतीय लाँयड्स मेटल कामगार संघाच्या सदैव पाठिशी- विवेक बोढे यांचे प्रतिपादन.
Bhairav Diwase. Oct 19, 2020
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस, चंद्रपुर
चंद्रपूर:- घुग्गुस येथील लाँयड्स मेटल कंपनीच्या भारतीय लाँयड्स मेटल कामगार संघाचे त्रिवार्षिक अधिवेशन प्रयास सभागृहात आयोजित करण्यात आले होते.

यावेळी उदघाटनकर्ता श्री देवराव निंदेकर जिल्हाउपाध्यक्ष , मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ प्रदेशाध्यक्ष रमेश बल्लेवार, जिल्हाउपाध्यक्ष अशोक मांडवकर, जिल्हामंत्री रमेश मुन, संघटनमंत्री दिपक डोंगरवार, घुग्गुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे, घुग्गुस भारतीय लाँयड्स मेटल कामगार संघाचे माजी उपाध्यक्ष पंकज रामटेके उपस्थित होते.

भारत मातेच्या प्रतीमेला द्विप प्रज्वलित करुन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. 
 याप्रसंगी मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वतीने देण्यात आलेल्या छत्र्या कामगारांना वाटप करण्यात आल्या. अधिवेशनास मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.