अंधाऱ्या रात्रीला, तो कोण असेल रेती तस्करांच्या साथिला.

Bhairav Diwase
साखरी घाटावरून रोजच होतेय रेतीतस्करी, प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष.
Bhairav Diwase.    Oct 05, 2020
(संग्रहित छायाचित्र)
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:-सावली तालुक्याला वरदान ठरणारी वैनगंगा नदी. या नदीच्या सिंचनाने अनेक शेतकरी आपली शेती करीत आहेत. शिवाय या नदीमुळे निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होत आहे. परंतु सावली तालुक्यात साखरी, सामदा, बोरमाळा व इतर वैनगंगेच्या घाटामधुन रेतीची तस्करी मोठया प्रमाणात होत आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत असुन, शासनाचा मोठया प्रमाणात महसूल बुडत आहे. मात्र याकडे संबधीत विभागाचे दुर्लक्ष होत आहे. रेतीतस्कर रात्रो - बेरात्रो सर्रासपणे ट्रॅक्टरद्वारे अवैध रेतीची वाहतूक करीत आहे. रेतीची चोरटी वाहतूक करीत असतांना भरधाव वेगाने वाहने चालत असुन मोठया अपघाताची शक्यता आहे. सध्या तालुक्यात कोणत्याही रेती घाटाचे लिलाव झाले नसतांना बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग इतर कंत्राटदारांना रेतीची उपलब्धता होत आहे. परंतु दारीद्रय रेषेखालील जनतेला मात्र रेती नसल्याच्या कारणावरून घराचे बांधकाम बंद करावे लागत आहे ही शोकांतीका आहे.
 'पण या रेती तस्करांना आळा घालनार कोण? महसुल विभागातील अधिकारी आर्थिक लोभापाई दुर्लक्ष करीत आहेत काय? अशी चर्चा नागरीकात केली जात आहे. शिवाय एखादा अधिकार्याने रेती तस्करी ची गाडी पकडली, पण पुढील कारवाई होतच नाही व या रेती तस्करांना अभय मिळत असते, अशी चर्चा गावातुन ऐकायला मिळते. हे जर सत्य असेल तर या रेती तस्करांना प्रशासनातील अधिकारीच मोकळा मार्ग करून देऊन सहकार्य करीत असल्याचे फलित होत असून शासनाचा महसुल बुडत आहे, तर अधिकार्याचे फावते आहे. त्यामुळे तो अधिकारी कोण? याची वरिष्ठ स्तरावरुन चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.