चिंतलधाबा येथील भारत बाळू नेवारे यांचा उपक्रम.
Bhairav Diwase. Oct 06, 2020
पोंभुर्णा:- सध्या संपूर्ण देशभरात कोरोणाचे सावट पसरलेले आहे. संपूर्ण देशाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. अशातच संपूर्ण शिक्षण व्यवस्था सुधा मागील काही महिन्यापासून ठप्प पडलेली आहे. याचा परिणाम शाळकरी मुलांवर होऊन त्यांची अभ्यासू वृत्ती कुठे तरी लुप्त होताना दिसत आहे. याच गोष्टिवर लक्ष केंद्रित करत पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा येथील रहिवासी असलेले भारत बाळू नेवारे यानी निशुल्क शिकवणी वर्ग सुरु केले.
चिंतलधाबा येथील भारत बाळू नेवारे यांनी अनोखा उपक्रम मागिल दोन महिन्यापासून सुरु केला आहे. लाकडाऊन च्या काळात गावातील शैक्षणिक वर्ग बंद होते. ऑनलाइन शिक्षण गावातील मुलं घेऊ शकत नव्हते. यामुळे चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णाचे विद्यार्थी भारत बाळू नेवारे यांने गावात जे ऑनलाइन शिक्षणापासून वंचित आहे. अशा विद्यार्थ्यांना निशुल्क शिकवणी वर्ग जुलै महिन्यापासून सुरुवात केली. मुलांची आता चांगलीच प्रगती दिसून येत आहे. या प्रयोगामागील प्रेरणा कालेश्वर नेवारे यांच्यापासून मिळाली.