(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
गडचांदूर - गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष मा. सतिशजी उपलेंचिवार यांनी या कोरोनाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सतत जनतेचे सेवेत राहिले. गोरगरिबांना मदतीचा हात देण्याचे काम केले. धान्य किट असो वा मास्क, सॅनिटायझर चे लोकात जाऊन वाटप मोठ्या प्रमाणात केले. व शेवटी त्यांना दि २८/९/२०२० रोजी कोरोना लागण झाली. लगेच त्यांना चंद्रपूर येथील नामवंत डाँ बुक्कावार येथे भरती करण्यात आले. गोरगरीबाचा, कुटुंबाचा, तसेच सर्व मित्रा मंडळींचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी असल्याने ईश्वरानी त्यांना कोरोनावर मात करण्याची शक्ती दिली. व आज ते कोरोनावर मात करून ते परत आपल्यात आले. म्हणून त्यांचे आज फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात आले. व अभिनंदन केले. यावेळी भाजपचे नेते तथा संजय गांधी निराधार कोरपना तालुका माजी अध्यक्ष श्री संजयभाऊ मुसळे, भाजप नेते निलेशजी ताजने, नगरसेवक अरविंदजी डोहे, संदीपजी शेरकी, भास्कर उरकुंडे, विशाल राव, अजीम बेग, शंकर आपूरकर, उपलेंचिवार सर तथा परिवार आदी उपस्थित राहून त्यांना भरभरून आशीर्वाद दिला.