(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
गडचांदुर:- येथील शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर चे मुख्य लिपिक श्री.शशांक शंकरराव नामेवार यांना गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार(संलग्नित महाविद्यालये) प्राप्त झाल्याबद्दल गडचांदूर शहर कॉंग्रेस कमिटी च्या वतीने नगरपालिका गडचांदूरच्या नगराध्यक्षा8 सौ. सविताताई टेकाम यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले त्याप्रसंगी नगरपालिकीचे बांधकाम सभापती विक्रम येरने, पापयाजी पोंनमवार, अरविंद मेश्राम, राहुल उमरे,सौ.अर्चनाताई वांढरे,गडचांदूर शहर अध्यक्ष संतोष महाडोळे, गडचांदूर शहर युवा अध्यक्ष रुपेश चुदरी, सुरेश टेकाम ,सुधीर सातपुते यांनी शशांक नामेवार यांचा घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केले .