(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ( रजी ट्रस्ट ) या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय गुनीजन गौरव महासम्मेलन व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२० नूकताच ऑनलाइन झुम अँपद्वारे संपन्न झाला . या संस्थेचे अध्यक्ष मा . ऍड. कृष्णाजी जमदाळे आणि इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत हा सोहळा घेण्यात आला. या सोहळ्यात धनराज दुर्योधन विज्ञान विषय शिक्षक यांना गुरूगौरव शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . धनराज दुर्योधन हे जि प उच्च प्राथ. शाळा भुरकुंडा ( बु . ) ता . राजुरा येथे विज्ञान विषय शिक्षक म्हणून कार्यरत आहे . धनराज दुर्योधन यांनी मावळा जवान संघटना पुणे या संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय निबंध लेखन स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला आहे. तसेच राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत द्वितीय , तृतीय सन्मानपत्राने सन्मानित झाले आहेत. तसेच राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत परीक्षक म्हणून सुध्दा त्यांनी कार्य पार पाडले आहे. यांचे विविध लेख सुद्धा पुण्यनगरी व महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रकाशीत झाले आहेत. त्याचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत.
त्यांच्या कार्याची दखल घेत त्याना राज्यस्तरीय गुणवत्त शिक्षक गुरूगौरव शिक्षकरत्न पूरस्काराने सन्मानित करण्यात आले. माझ्या कार्याची दखल घेत मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या सोस्थेचे त्यांनी आभार मानले या पुरस्काराचे स्वरूप मानचिन्ह , गौरवपदक मानपत्र , मानकरी बॅच मानाचा फेटा आहे.