(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- तत्कालीन आमदार व विद्यमान महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या वाहनचालकाने अमरावती येथील गांधी चौक ते चुनाभट्टी या मार्गावरुन वाहन नेले. सदर मार्ग एकेरी वाहतूकीचा (वन-वे) असल्यामुळे तेथील वाहतूक पोलीस उल्हास रवराळे यांनी यशोमती ठाकूर यांचे वाहन थांबविले. वाहन थांबाविल्यामुळे यशोमती यांचे वाहनचालक आणि इतर दोन कार्यकर्त्यांनी वाहतूक पोलीस उल्हास रवराळे यांच्याशी वाद घालुन कॉलर पकडून त्यांना मारहाण केली, रवराळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी यशोमती ठाकूर आणि इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. जिल्हा न्यायालयात यशोमती ठाकूर आणि अन्य तिघांविरुद्ध गुन्हे सिद्ध झाले त्यानुसार त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे..
वाहनांसाठी रस्ता बंद आहे , असे समजावून सांगणाऱ्या आणि आपले कर्तव्य निभावणाऱ्या खाकी वर्दितील पोलिसाला सत्तेच्या मस्तीत मारहाण करणाऱ्या काँग्रेसच्या तत्कालीन आमदार व राज्याच्या विद्यमान महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवल्याने त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या मंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दयावा, यासाठी तहसील कार्यालय मूल येथे घोषणाबाजी करत महविकास आघाडी सरकारचा निषेध करून भाजपा मूल तर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी जि.प. अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले, प.स.सभापती श्री.चंदूभाऊ मारगोनवार,न.प. चे उपाध्यक्ष नंदूभाऊ रणदिवे,भाजपा कार्यकर्ता श्री.चंदूभाऊ आष्टनकर, प.स. सदस्या सौ. वर्षाताई लोनबले,नगरसेवक श्री.प्रशांतभाऊ समर्थ, मुकेशजी गेडाम, शुभमजी समर्थ, उत्तमभाऊ लेनगुरे,ईश्वर कोरडे, स्वप्नील ढपकस,गजानन भोयर,नरेंद्र बोरकुटे यांच्यासह भाजपा चे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.