(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्ष पदी तालुका काँग्रेस कमिटी चे माजी कार्याध्यक्ष व राजुरा नागरी सह. पत संस्था चे संचालक साईनाथ बतकमवार यांची निवड करण्यात आली.
त्याप्रसंगी आमदार सुभाषभाऊ धोटे, नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, विजयराव बावणे, दादा पाटील लांडे, कुंदाताई जेणेकर, एजाज अहमद, अशोक राव, संस्कार बतकमवार, शाहनवाज कुरेशी, राजकुमार ठाकूर, ईरशाद शेख यांनी अभिनंदन केले आहे.