चंद्रपूर जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी संदर्भात ना. अनिल देशमुख गृहमंत्री कडे निवेदन देऊन तक्रार.

Bhairav Diwase

Bhairav Diwase.    Oct 04, 2020


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी संदर्भात दिनांक 3 ऑक्टोबर रोजी ना. अनिल देशमुख साहेब, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांना निवेदन देऊन तक्रार करण्यात आली. सदर निवेदन शरद पवार विचार मंचचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री शशिकांत देशकर यांच्या मार्गदर्शनात तसेच शरद पवार विचार मंच जिल्हाध्यक्ष निमेश मानकर यांच्या नेतृत्वात पोलीस जिमखाना, सिव्हिल लाईन, नागपूर इथे देण्यात आले.
 
        चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता ना. गृहमंत्री साहेब, यांना विनंती करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले असून चंद्रपूर शहरात मागील 15 दिवसात तीन खून (मर्डर) झाले आहे. यात रयतवारी कॉलेरी परिसरातील दोन व्यक्ती तसेच म्हाडा कॉलनीती एक (राहणार बंगाली कॅम्प) व्यक्तीचा समावेश आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरात लोकांमध्ये भीती निर्माण झाली असून कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारू तस्करी, अवैध कोळसा चोरी, वाळू तस्करी, तसेच महिलांवर होणारे अत्याचाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अश्या प्रवृत्तीच्या लोकांना आळा बसणे गरजेचं आहे. जेणेकरून चंद्रपूर जिल्हा पोलिसाबाबत लोकांमध्ये विश्वास निर्माण होऊन भीती कमी होण्यास मदत होईल. ना. गृहमंत्री साहेबांनी या संदर्भात गांभीर्याने दखल  घेत चंद्रपुर जिल्हा पोलिस अधीक्षक यांना या संदर्भात निर्देश देऊन गुन्हा थांबविण्यासाठी योग्य ते पाऊल  उचलणार असे सांगितले. निवेदन देतांना संजय तुरीले,  बाबा सातपुते यांची उपस्थिती होती.